मुख्य बातमी

राजेंद्र लहु आयरे यांचे अल्पशा आजाराने निधन

रत्नागिरी : बहुजन समाज पार्टीचे प्रदेश सचिव, विद्यार्थी दशेपासून आंबेडकर चळवळीतील मान्यवर काशिरामजींच्या सानिध्यात घडलेले मिशनरी, लढवय्ये नेते, कोकण झोन प्रभारी राजेंद्र लहु आयरे (वय ६९) यांचे आज (४ नोव्हेंबर) निधन झाले.

ही घटना बदलापूर येथे दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. त्यांच्या निधनाने बहुजन चळवळीत शोककळा पसरली आहे. परटवणे, अशोकनगर (रत्नागिरी) येथील रहिवासी असलेले राजेंद्र आयरे यांनी दीर्घकाळ बहुजन समाज पक्षात सक्रिय कार्य केले. बहुजन चळवळीसाठी त्यांनी आयुष्य वाहून घेतले असून, समाजहितासाठी त्यांच्या लढाऊ वृत्तीमुळे ते कार्यकर्त्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय होते.

ते स्टरलाईट प्रकल्प विरोधी समितीचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहत होते आणि रत्नागिरीतील विविध सामाजिक प्रश्नांवर नेहमीच अग्रभागी राहिले. काही दिवसांपूर्वी ते आपल्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी बदलापूर येथे गेले होते, तिथेच अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले. त्यांचा मृतदेह बदलापूर येथून रत्नागिरी येथे रात्री उशिरा त्यांच्या निवासस्थानी आणण्यात येणार आहे.

आपल्या विद्यार्थी दशेपासून आंबेडकरी चळवळीशी जोडले गेलेले राजेंद्र आयरे यांचे निधन बहुजन समाज पार्टीसोबतच बहुजन चळवळीसाठी न भरून येणारे नुकसान असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

त्यांचा अंत्यसंस्काराचा विधी उद्या (५ नोव्हेंबर) सकाळी ११ वाजता होणार आहे. त्यांची अंत्ययात्रा अशोक नगर, परटवणे, येथून निघेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!