Uncategorized

उत्पन्नाच्या दाखल्यांसाठी २१, २२ मे रोजी कॅम्प

खासदार नारायण राणे यांच्या संपर्क कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन

रत्नागिरी : विद्यार्थ्यांचे प्रवेश सुलभ व्हावेत आणि ऐनवेळी होणारी गैरसोय टाळावी यासाठी माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांच्या संपर्क कार्यालयात दोन दिवस उत्पन्नाच्या दाखल्यांसाठी कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. २१ मे आणि २२ मे या दिवशी सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत शहरातील आरोग्यमंदिर, अपना बाजार शेजारी असलेल्या संपर्क कार्यालयात हा कॅम्प होणार आहे.

दहावी आणि बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून आता विद्यार्थ्यांची नवीन वर्षाच्या महाविद्यालयीन प्रवेशासाठी धावपळ सुरू झाली आहे. प्रवेश प्रक्रिया करताना विद्यार्थ्यांना उत्पन्नाच्या दाखल्यांची आवश्यकता असते; मात्र सेतू कार्यालयांमध्ये होणारी गर्दी पाहता विद्यार्थ्यांना दाखले सहज उपलब्ध व्हावेत आणि प्रशासनावरील ताण कमी व्हावा या उद्देशाने रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचे खासदार नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यमंदिर, आपना बाजार शेजारी असलेल्या संपर्क कार्यालयात उत्पन्नाच्या दाखवण्यासाठी दोन दिवस मोफत कॅम्प आयोजित करण्यात आला आहे.

यावेळी उत्पन्नाच्या दाखवण्यासाठी आवश्यक अर्ज कार्यालयात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांनी येताना २ फोटो, रेशन कार्ड, पालकाचे व विद्यार्थ्यांचे आधार कार्ड, झेरॉक्स व ओरिजनल घेऊन यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!