मुख्य बातमी

संबंधित नगरपालिका, नगरपंचायत निर्वाचन क्षेत्रामध्ये “या दिवशी” मद्य विक्री बंद

रत्नागिरी : निवडणूक खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी तसेच संबंधित नगरपरिषदा, नगरपंचायत निर्वाचन क्षेत्रामध्ये  कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी १ डिसेंबर (मतदानाच्या आदला दिवस), २ डिसेंबर (मतदानाचा दिवस) आणि ३ डिसेंबर रोजी (मतमोजणीचा दिवस) या तीन दिवशी रत्नागिरी जिल्ह्यात निवडणूक होणाऱ्या संबंधित नगरपरिषदा, नगरपंचायत निर्वाचन क्षेत्रातील सर्व देशी-विदेशी किरकोळ मद्य व माडी विक्री अनुज्ञप्ती संपूर्ण दिवस मद्य विक्रीस बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

राज्यातील २४६ नगरपालिका व ४२ नगरपंचायतीच्या (एकूण २८८) सदस्य पदासाठी व थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमानुसार, रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर, रत्नागिरी, चिपळूण व खेड या नगरपालिका व लांजा, देवरुख, गुहागर या नगरपंचायतींच्या सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकींसाठी २ डिसेंबर रोजी मतदान व ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

ही निवडणूक खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी तसेच संबंधित नगरपालिका, नगरपंचायत निर्वाचन क्षेत्रामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्हाधिकारी श्री. जिंदल यांनी मुंबई मद्य निषेध अधिनियम, १९४९ चे कलम १४२ नुसार प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून जिल्ह्यात निवडणूक असलेल्या संबंधित नगरपरिषदा, नगरपंचायत निर्वाचन क्षेत्रातील सर्व देशी-विदेशी किरकोळ मद्य विक्री व माडी विक्री अनुज्ञप्ती (नमुना एफएल-२, एफएल-३. एफएल- ४ (क्लब अनुज्ञप्ती), एफएल / बीआर-२, सीएल-२, सीएल-३, सीएल / एफएल/टिओडी-३, टिडी-१ इ.) १, २ आणि ३ डिसेंबर या तीन दिवशी रत्नागिरी जिल्ह्यात निवडणूक होणाऱ्या नगरपालिका, नगरपंचायत निर्वाचन क्षेत्रातील सर्व देशी-विदेशी किरकोळ मद्य व माडी विक्री अनुज्ञप्ती संपूर्ण दिवस मद्य विक्रीस बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

या आदेशाची अंमलबजावणी काटेकोरपणे करायची असून त्यात कसूर झाल्यास संबंधित अनुज्ञप्तीधारकांविरुध्द कायदेशीर कारवाई केली जाणार असून, महाराष्ट्र दारूबंदी कायदा, १९४९ कलम ५४ व ५६ मधील तरतुदीनुसार अनुज्ञप्ती कायमस्वरूपी रद्द केली जाणार आहे..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!