मुख्य बातमी

मेर्वी श्री स्वामी समर्थ मठात दत्त जयंतीनिमित्त भरगच्च कार्यक्रम

गावखडी : रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी येथे श्री स्वामी समर्थ मठात दत्त जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.

४ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजता श्री स्वामी समर्थांची पूजा, ९ वाजता अभिषेक होईल. दुपारी १२ वाजता पालखी प्रदक्षिणा, १२.३० वाजता आरती होईल. त्यानंतर दुपारी १ ते ३ या कालावधीत महाप्रसादाचे वाटप केले जाईल. सायंकाळी ६ वाजता भजनीबुवा वासुदेव वाघे (पूर्णगड) यांचा, तर ७.३० वाजता भजनी बुवा सीमा मोरे कला (रत्नागिरी) यांचे भजन होईल. रात्री १० वाजता महाप्रसादाचे वाटप होईल.

भाविकांनी या कार्यक्रमांचा लाभ मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन मेर्वी मठाचे पुजारी सहदेव पावसकर यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!