आम्ही शेतकरी- कृषीमुख्य बातमी

मत्स्य व्यवस्थापनाशी संबंधित घटकांना कृषी दराप्रमाणे वीजदर सवलत

आवश्यक कागदपत्रांसह सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय कार्यालयात अर्ज करण्याचे आवाहन

रत्नागिरी : मच्छिमार, मत्स्यसंवर्धक, मत्स्यव्यावसायिक, मत्स्यकास्तकार, मत्स्यबीज, मत्स्य बोटुकली संवर्धक व मत्स्य व्यवस्थापनाशी संबंधित घटकांना (मत्स्यप्रक्रिया उद्योग वगळून) कृषी दराप्रमाणे वीजदर सवलत (लघुदाब/उच्चदाब/अतिउच्चदाब) मिळणार आहे. यासाठी आवश्यक कागदपत्रांसह सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय यांच्या कार्यालयात अर्ज सादर करण्याचे आवाहन मत्स्यव्यवसाय विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी केले आहे.

मच्छिमार, मत्स्यसंवर्धक, मत्स्यव्यावसायिक, मत्स्यकास्तकार, मत्स्यबीज/मत्स्य बोटुकली संवर्धक व मत्स्य व्यवस्थापनाशी संबंधित घटकांना (मत्स्यप्रक्रिया उद्योग वगळून) कृषी समकक्ष दर्जा देण्यात आलेला आहे. याअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना कृषी दराप्रमाणे वीजदर सवलत मिळणार आहे. यासाठीचा अर्जावर सोबत दिलेला क्यूआर कोड स्कॅन करून येणाऱ्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येईल. याच बरोबर संकेतस्थळावर यासाठी आवश्यक कागदपत्रे आणि अटी व शर्ती याबाबत माहिती मिळेल.

अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय यांच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त यांच्या कार्यालायाकडून करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!