महाराष्ट्रमुख्य बातमी
मुसळधार पावसाने मुंबईची जीवनवाहिनी ठप्प
मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक बंद

मुंबई : मुंबई शहर, उपनगरासह ठाणे, कल्याण डोंबिवली, बदलापूर, वसई विरार, नवी मुंबईतील वाशी, पनवेल भागात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईची जीवनवाहिनी ठप्प झाली आहे. मध्य आणि हार्बर रेल्वेमार्गावरील वाहतूक बंद झालेली आहे.
मध्य रेल्वेवरील सीएसएमटी ते ठाणे या दरम्यान लोकल वाहतूक बंद करण्यात आली आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या मुंबई विभागीय कार्यालयाच्या अधिकृत ‘एक्स’ हँडलवरुन देण्यात आली आहे.


