एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयात क्विझ आयटी टेक फेस्टआणि ऑटो एक्सपो उत्साहात

रत्नागिरी : येथील एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयात क्विझ आयटी टेक फेस्ट उत्साहात झाला. यावेळी प्रमुख पाहुणे व प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी केतन पाटील, युवा उद्योजक गौरंग आगाशे, नगरसेवक सौरभ मलुष्टे, नवनिर्माण शिक्षण संस्थेचे चेअरमन अभिजीत हेगशेट्ये, संचालिका सीमा हेगशेट्ये , प्राचार्य डॉ. संजय गवाळे, प्रा. सुकुमार शिंदे, नवनिर्माण हायचे मुख्याध्यापक उल्हास सप्रे, कम्प्युटर सायन्स आणि आयटी विभागप्रमुख प्रा. प्रतीक्षा सुपल आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पुणे, कोल्हापूर येथील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. क्विझ आयटी टेक फेस्टमध्ये क्विझ, स्मार्ट कोडर, वेब क्लास, गेम वॉर, गुगल आयटी, रील एक्सपर्ट, कॅन्वा अंड एडोब एक्सप्रेस, आयओटी प्रोजेक्ट, लाईन फॉलोईंग रोबोट अशा विविध इव्हेंट्स मध्ये ३०० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते.
ऑटो एक्सपो मध्ये १०० सीसी ते २१०० सीसीपर्यंत बाईक आल्या होत्या. यामध्ये इलोन मर्क्स यांची कंपनी ची टेसला गाडी ऑटो एक्सपोमध्ये सहभागी होती. सुपर कार्स, सुपर बाईक्स, विंटेज कार या एक्सपमध्ये सहभागी झाल्या होत्या. यामध्ये एक्सपोमध्ये बाईक किंवा कार कसे फॉर्मुला आणि ड्रग्रेसीन मध्ये कोणत्या टेक्नॉलॉजी मॉडिफिकेशन केल्या जातात, स्टेज कशा फॉलो केल्या जातात याचा सुद्धा लाईव्ह डेमो दाखवला गेला. दिव्याच्या लाईट्सपासून ते मॅट्रिक स्टाईल हेडलाइट्स, मल्टी बीम एलईडी लेझर लाईट याचे इन्वेंशन कसे केले, त्याचबरोबर कार मध्ये अडस, एआय फीचर्स, सेल्फ ड्रायव्हिंग मोडचे इंवेंशन कसे केले गेले हे दाखवण्यात आले.

या ऑटो एक्सपोमध्ये टेसला मॉडेल Y, रेंज रोव्हर डिफेंडर १३०, मर्सिडीज GLS 300d, मर्सिडीज C200d, मर्सिडीज E220d, टोयोटा फॉर्च्युनर, महिंद्रा थार, सुझुकी जिप्सी, थार रॉक्स, शेवरलेट क्रूझ फोर व्हीलर तसेच टू व्हीलर सुझुकी हायाबुसा, Bmw gs 1250, आफ्रिकन ट्विन, ट्रायम्फ टायगर ८००, हार्ले डेव्हिडसन, डुकाटी evo ८४८, कावासाकी z900, कावासाकी १०००, कावासाकी f १०००, कावासाकी निन्जा ३००, रॉयल एनफिल्ड gt ६५०, रॉयल एनफिल्ड इंटरसेप्टर ६५०, रॉयल एनफिल्ड गोरिल्ला ४००, रॉयल एनफिल्ड क्लासिक ५००, रॉयल एनफिल्ड मेटिओर ३५० अशा तीसहून अधिक फोर व्हीलर आणि १००+ बाइक्स सहभागी झाल्या होत्या.
क्विझ आयटी टेक फेस्ट या स्पर्धेचा निकाल :
गेम वॉर (फ्री फायर) : गोगटे जोगळेकर महाविद्यालय, गोगटे जोगळेकर महाविद्यालय (रत्नागिरी),
गेम वॉर(BGMI) : डीबीजे कॉलेज (चिपळूण), नवनिर्माण कनिष्ठ महाविद्यालय (रत्नागिरी),
वेब क्लाश : रोहन पष्टे (गोगटे जोगळेकर महाविद्यालय), ऋषिकेश (एसआरएम कॉलेज कुडाळ)
स्मार्ट कोडर : यशोदीप उगावेकर (एसआरएम), दक्षित माने (गोगटे कॉलेज), सेहेर मुकादम (पॉली आरटीएन),
गुगल आयटी : सलोनी भुजबळराव (नवनिर्माण महाविद्यालय, रत्नागिरी), मुनीफ धामस्कर (गोगटे कॉलेज), रोहन पष्टे (गोगटे कॉलेज)
रील एक्सपर्ट : तेजस पांगरीकर (फिनोलेक्स अकादमी, रत्नागिरी), पियुष चव्हाण (पॉलिटेक्निक शासकीय महाविद्यालय, रत्नागिरी), साहिल सावंत (एसआरएम, कुडाळ)
आयओटी प्रोजेक्ट sphere : प्रथमेश यशवंत पालव आणि परीक्षित संतोष वाडकर (एमआयटीएम कॉलेज, सिंधुदुर्ग) पालवी विनायक पाथरे आणि हर्षद विलास सुतार (गोगटे कॉलेज), वैष्णवी भदरगे आणि साक्षी साखरे (शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय रत्नागिरी).
लाईन फॉलोइंग रोबोट : राज अनंत गुरव (गोगटे कॉलेज).
कॅनव्हा आणि अडोब एक्सप्रेस : विघ्नेश तांबे (गोगटे कॉलेज), मुद्रा भिसे (गोगटे कॉलेज), नितीन रावळे (संत रावूल महाराज महाविद्यालय, कुडाळ).
क्विझ : प्रथम -वेदांत महेश तेंडुलकर आणि
वैष्णवी नंदकिशोर शिरसाट. द्वितीय – साहिल संजय गुरव आणि सुजल रवींद्र बोंडकर.
तृतीय – सानिया मुबारक मालगुंदकर आणि मुस्तफा उमर जांभारकर. क्विझ आयटी टेक फेस्ट या स्पर्धेचे चॅम्पियन ट्रॉफी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाला मिळाली.



