मुख्य बातमी

महिलांसाठी सोमवारी ‘गद्रे मरीन एक्सपोर्ट’मध्ये रोजगार मेळावा

रत्नागिरी : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने जिल्ह्यातील रोजगार इच्छुक महिला उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिने २०० हून अधिक महिलांसाठी (१० वी पास/नापास, १२वी पास) पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन सोमवारी (७ एप्रिल) सकाळी १० वाजता, गद्रे मरिन एक्सपोर्ट प्रा.लि. एमआयडीसी मिरजोळे ब्लॉक येथे करण्यात आलेला आहे.

जिल्ह्यातील सर्व उमेदवारांनी रोजगार संधीचा लाभ घेण्यासाठी त्यांची नोंदणी या विभागाच्या www.mahaswayam.gov.in पोर्टलवर करावी. नोंदणीकृत असलेल्या सर्व उमेदवारांनी त्यांचे प्रोफाईल अद्ययावत करावे. नोंदणी केलल्या उमेदवारांनी त्यांच्याकडील युझर आयडी व पासवर्डच्या सहाय्याने ७ एप्रिल रोजीच्या पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावामध्ये ऑनलाईन अर्ज करून रोजगार मेळाव्याच्या दिवशी मुलाखतीसाठी त्यांचे बायोडाटा व इतर आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांच्या प्रतींसह प्रत्यक्ष उपस्थित राहावे.

रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी आपली नोंदणी नसल्यास कृपया कार्यालयाकडे त्वरित संपर्क साधून नोंदणी करावी व रोजगार मेळाव्यात सहभागी होऊन रोजगार संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त इनुजा शेख यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!