खासदार नारायण राणे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर
शासकीय योजनांची होणार नोंदणी

रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार नारायण राणे यांच्या ७५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून रत्नागिरी शहरात भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबी आणि मोफत आभा कार्ड व वयवंदना नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने हे विशेष पाऊल उचलण्यात आले आहे.
हे शिबिर ६ ते ८ एप्रिल असे सलग तीन दिवस चालणार आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत हे शिबिर खासदार नारायण राणे जनसंपर्क कार्यालय, आरोग्य मंदिर, रत्नागिरी येथे होणार आहे. या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली विविध वैद्यकीय चाचण्या पूर्णपणे मोफत केल्या जाणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने रक्त चाचण्या शुगर, बीपी, एचबी, सीबीसी, महिलांसाठी कॅन्सर तपासणी आणि मुख (तोंड) कॅन्सर तपासणी या विशेष तपासणी तसेच डोळे तपासणी आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आवश्यक असल्यास ईसीजी सुविधा देखील उपलब्ध असेल. तसेच ६ आणि ८ एप्रिल रोजी नंदादीप नेत्रालयाच्या वतीने मोफत डोळे तपासणी होणार आहे. तर रामनाथ हॉस्पिटलतर्फे ७ एप्रिलला आरोग्य तपासणी होणार आहे.
आरोग्य तपासणीसोबतच, शासनाच्या महत्त्वाच्या योजनांचा लाभ नागरिकांना मिळावा यासाठी ‘आभा कार्ड’ आणि ‘वयवंदना’ योजनेची मोफत नोंदणी केली जाणार आहे. या योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी येताना खालील कागदपत्रे सोबत आणणे अनिवार्य आहे. त्यामध्ये रेशन कार्ड, आधार कार्ड, आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर यांचा समावेश आहे.
रत्नागिरी आणि परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे. खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या सामाजिक उपक्रमामुळे गरीब आणि गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. अधिक माहितीसाठी अमोल देसाई (89992 51217) आणि अभिलाष कारेकर (70575 76474) यांच्याशी संपर्क साधावा.



