मुख्य बातमी

कोतवडे हायस्कूलमध्ये पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन उत्साहात 

रत्नागिरी : कोतवडे ग्रामस्थ मंडळ मुंबई संचलित श्री. वि. Kप. कोतवडे इंग्लिश स्कूल कोतवडेचा शैक्षणिक वर्ष २०२५-२६ चा वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले.

यावेळी कोतवडे ग्रामस्थ मंडळ मुंबईचे अध्यक्ष गजानन पेडणेकर, प्रमुख पाहुणे सतीश शेवडे, संस्थेचे उपाध्यक्ष संजय मयेकर, कार्यवाह संजय कोलगे, सहसचिव राजेंद्र फणसोपकर, खजिनदार सत्यवान तळेकर, शाळा समिती अध्यक्ष नरेश कांबळे, सदस्य प्रकाश ठोंबरे, अनंत पालये, राजेंद्र कोसले, अविनाश रामाणे, शंकर कोळंबेकर, रोशन कांबळे कोतवडेचे सरपंच संतोष बारगोडे, रत्नागिरी तालुका संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष स्वप्नील तथा तारक भाई मयेकर, डॉ. कुलकर्णी, डॉ. संजय पाटील, विजय बेहेरे, गौतम सावंत, मंदार थेराडे, पोलीस पाटील सौ. वैष्णवी माने, सौ. पूर्वा पवार, विठ्ठल लांजेकर, किशोर पेडणेकर, सुनील कांबळे, शाळेचे मुख्याध्यापक प्रेमदास पवार यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व पालक ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन व स्वागतगीताने झाली. मान्यवरांचे स्वागत झाल्यानंतर विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले तसेच दहावी २०२४-२५ या वर्षामध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचाही सन्मान करण्यात आला. शाळेची माजी विद्यार्थिनी अदिती अविनाश चव्हाण रत्नागिरी पोलीस खात्यात भरती झाल्याबद्दल तिचा सत्कार करण्यात आला.

त्याचप्रमाणे गावातील प्रतिष्ठित व्यापारी देवासी, मंदार थेराडे, गजानन बारगोडे, सुनील कोलगे, दयानंद पोवार, सुशांत सहस्रबुद्धे अरविंद कांबळे, राजेंद्र वारेकर, राजेंद्र पात्रोट, सेवक प्रमोद पांचाळ, सेविका श्रीमती गीता खांडके, शाल, पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सौ. सुनंदा विवेक तथा मुन्नाभाई कोतवडेकर यांनी सव्वा लाख रुपयांची देणगी दिल्याबद्दल त्यांचाही सन्मान करण्यात आला. सालाबाद प्रमाणे इयत्ता दहावीची श्री सत्यनारायण महापूजा आयोजित केली होती. यावेळी कोतवडे हायस्कूलमधील विविध विभागांच्या वतीने संस्कृत प्रदर्शन, चित्रकला प्रदर्शन, रांगोळी प्रदर्शन व विज्ञान प्रदर्शन आयोजित केले होते.

आपल्या मनोगतामध्ये विचार मांडताना कोतवडे ग्रामस्थ मंडळ मुंबईचे उपाध्यक्ष यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा घेतला. प्रमुख पाहुणे सतीश शेवडे यांनी देखील शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेली सर्व मदत रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून करण्याचे आश्वासन दिले. शाळेचे मुख्याध्यापक प्रेमदास पवार यांनी सर्व मान्यवर मंडळींना धन्यवाद दिले. यावेळी दिगंबर तथा बापू जोशी सर यांच्या वतीने दिला जाणारा श्री स्वामी समर्थ आदर्श शिक्षक पुरस्कार कलाशिक्षक श्री. बागुल यांना देण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुरुदास खुळे व सौ. सुर्वे यांनी केले. पाहुण्यांची ओळख व स्वागत श्रीमती पेडणेकर यांनी केले. पारितोषिक वितरण श्री. लिंगायत व श्री. जाधव यांनी, तर प्रास्ताविक श्री. पवार यांनी केले. ईशस्तवन व स्वागत पद्याची विशेष तयारी श्री. लिंगायत सर व श्रीमती शितूत यांनी केली. आभार श्री. नाईक यांनी मानले. यानंतर विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम कोतवडे हायस्कूलच्या भव्य रंगमंचावरती सादर करण्यात आला. शाळेच्या इमारतीला लाइटिंग व ध्वनी व्यवस्था यश लिंगायत यांनी केली. ग्रामपंचायत कोतवडे व माजी विद्यार्थी अमित लोखंडे यांनी श्रोत्यांसाठी खुर्च्या उपलब्ध केल्या. शाळेच्या एकंदरीत प्रगतीविषयी सर्व मान्यवर मंडळींनी व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!