मुख्य बातमी

कोतवडेच्या श्री. वि. प. कोतवडे इंग्लिश स्कूलचा निकाल १०० टक्के

स्वप्नील (तारक) मयेकर यांच्या वतीने कोतवडे हायस्कूलचे अभिनंदन 

रत्नागिरी : कोतवडे ग्रामस्थ मंडळ मुंबई संचलित कोतवडेतील श्री. वि. प . कोतवडे इंग्लिश स्कूलचा मार्च २०२६ इयत्ता दहावीचा निकाल १०० टक्के लागला. याबद्दल रत्नागिरी पंचायत समितीचे सदस्य, संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष व शिवसेना कोतवडे विभागाचे प्रमुख स्वप्नील तथा तारक मयेकर, कोतवडे ग्रुप ग्रामपंचायत प्रशासक व माजी सरपंच संतोष बारगोडे, माजी उपसरपंच स्वप्नील पड्याळ यांच्या वतीने शाळेचे मुख्याध्यापक प्रेमदास पवार यांचे पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी कोतवडे ग्रामस्थ मंडळ मुंबईचे उपाध्यक्ष संजय मयेकर, कार्यवाह संजय कोलगे, शाळा समिती अध्यक्ष नरेश कांबळे, कार्यकारणी सदस्य प्रकाश ठोंबरे, शाळेतील शिक्षिका सौ. शिल्पा सुर्वे, शिक्षक सचिन कोलगे, लिपिक संदीप कोलगे, सेवक प्रमोद पांचाळ, सेविका श्रीमती गीता खांडके उपस्थित होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!