भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण पुरस्कृत मुरुगवाडा क्रिकेट मंडळ आयोजित नाईट अंडर आर्म लिग क्रिकेट स्पर्धा उत्साहात

रत्नागिरी : भारतीय जनता पार्टी (भाजपा) प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण पुरस्कृत, युवा नेते अनिकेत पटवर्धन आणि शहराध्यक्ष दादा ढेकणे यांच्या सहकार्याने मुरुगवाडा क्रिकेट मंडळ आयोजित नाईट अंडर आर्म लिग क्रिकेट स्पर्धा उत्साहात पार पडली.
या स्पर्धेचा बक्षीस समारंभ रत्नागिरीचे उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर, महिला शहराध्यक्ष भक्ती दळी, जाकिमिऱ्या सरपंच आकांक्षा निलेश कीर, माजी महिला शहराध्यक्ष पल्लवी पाटील, माजी कामगार मोर्चा जिल्हाध्यक्ष संतोष बोरकर, नगरसेवक नितीन जाधव, उद्योजक सचिन टाकळे, शैलेश बेर्डे, नितीन गांगण, रामभाऊ शेलटकर, विजय मालवदे, मनोर दळी, विजयता भाटकर, रविंद्र कांबळे, विकास मयेकर, सुधीर वायंगणकर, दिलीप भोळे, अनंत भोळे, सतीश भोळे, दीपक भोळे, छोट्या मयेकर, मंदार जोशी, अभिषेक भोळे, वैभव भोळे, जयदार भोळे, सनातन भोळे, तुषार पिलणकर, सागर पिलणकर, विक्रांत जोशी, निखिल कांबळे यांच्या उपस्थितीत पार पडला. या स्पर्धेत उमर ११ साखरतर संघ विजेता, तर जय भैरी मुरुगवाडा संघ उपविजेता ठरला. मालिकावीर आणि उत्कृष्ट फलंदाज स्मित शिवलकर, सामनावीर अक्षय चाळके, उत्कृष्ट गोलंदाज सिद्दीक, उत्कृष्ठ क्षेत्ररक्षक मानस लाकडे यांना गौरविण्यात आले.
या स्पर्धेमध्ये विजेता चषक महिला जिल्हाध्यक्ष वर्षा ढेकणे, उपवेजेता चषक शहराध्यक्ष दादा ढेकणे, वैयक्तिक बक्षिसे नितीन जाधव, राजेंद्र फाळके, पल्लवी पाटील, संतोष बोरकर, अमर कीर यांनी पुरस्कृत केली होती. या स्पर्धेसाठी मधुकर बेंद्रे आणि प्रथमेश कांबळे यांनी लाईट व्यवस्था उपलब्ध करून मोठे सहकार्य केले. शेवटी मंदार भोळे आणि मंदिरा मंदार भोळे यांनी मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन आभार मानले.



