रत्नागिरी पालिकेचे नगराध्यक्षपद महिला सर्वसाधारण, तर चिपळूण पालिकेचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण
६७ नगरपालिकांपैकी ३४ पालिकांचे नगराध्यक्षपद ओबीसी महिलांसाठी आरक्षित

रत्नागिरी : सर्वांचेच लक्ष लागून राहिलेल्या रत्नागिरी नगरपालिका व चिपळूण नगरपालिका नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर झाले आहे. या आरक्षणामुळे अनेकांच्या अपेक्षा बळावल्या आहेत. तर अनेकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. रत्नागिरी नगरपालिका नगराध्यक्ष पदाचे आरक्षण महिला सर्वसाधारण पडले आहे. त्यामुळे महिला सर्वसाधारण मधून आता महिला नगराध्यक्षपदी बसणार हे निश्चित झाले आहे. तसेच चिपळूण नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी सर्वसाधारण आरक्षण पडल्याने चिपळूणमध्ये मात्र आता सर्वपक्षीय चढाओढ निर्माण होणार आहे.
ओबीसी महिला आरक्षण पडलेल्या नगरपालिका अशा : भगूर – ओबीसी महिला, इगतपुरी – ओबीसी महिला, विटा – ओबीसी महिला, बल्हारपूर – ओबीसी महिला, धाराशिव – ओबीसी महिला, भोकरदन – ओबीसी महिला, जुन्नर – ओबीसी महिला, उमरेड – ओबीसी महिला, दौडं – ओबीसी महिला, कुळगाव बदलापूर – ओबीसी महिला, हिंगोली – ओबीसी महिला, फुलगाव – ओबीसी महिला, मुरुड जंजीरा – ओबीसी महिला, शिरूर – ओबीसी महिला, काटोल – ओबीसी महिला, माजलगाव – ओबीसी महिला, मूल – ओबीसी महिला, मालवण – ओबीसी महिला, देसाईगंज – ओबीसी महिला, हिवरखेड – ओबीसी महिला, अकोट – ओबीसी महिला, मोर्शी – ओबीसी महिला, नेर- नवाबपूर – ओबीसी महिला, औसा – ओबीसी महिला, कर्जत – ओबीसी महिला, देगलूर – ओबीसी महिला, चोपडा – ओबीसी महिला, सटाणा- ओबीसी महिला, दोंडाईचा वरवडे – ओबीसी महिला, बाळापूर – ओबीसी महिला, रोहा – ओबीसी महिला, कुरडुवादी – ओबीसी महिला, धामणगावरेल्वे – ओबीसी महिला, वरोरा – ओबीसी महिला.



