महाराष्ट्रमुख्य बातमी

मान्सून पुढील काही तासांत केरळमध्ये धडकणार

राज्यातील कोकण, मराठवाडा व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई : भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, मान्सूनच्या आगमनासाठी केरळमध्ये सध्या पोषक वातावरण तयार झाले आहे. कोणत्याही क्षणी मान्सून केरळमध्ये धडकणार असल्याचा अंदाज आहे. येत्या २४ तासांत मान्सून केरळच्या किनारपट्टीवर धडकण्याची दाट शक्यता आहे. ४ जूनपर्यंत मान्सून केरळमध्ये पूर्णपणे सक्रिय होईल, अशी चिन्हं सध्याच्या हवामान प्रणालीच्या हालचालींवरून दिसत आहेत. पुढील काही तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होईल. त्यानंतर पुढील ४ दिवसांत तळकोकणात मान्सून धडकेल. अन् कोकणातून मुंबई आणि महाराष्ट्रभर मान्सून प्रवास करेल, असा अंदाज आहे. १० तारखेपर्यंत मान्सून मुंबईत दाखल होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

मुख्य मान्सून केरळमध्ये दाखल होण्यापूर्वीच महाराष्ट्रातील हवामानात वेगाने बदल झाले आहेत. राज्याच्या विविध भागांत सध्या मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. विशेषतः कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील काही तासांत जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. या मान्सूनपूर्व पावसामुळे गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

मुख्य मान्सून दाखल होण्यापूर्वीच राज्याच्या विविध भागांत हवामान बदलले आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. कोल्हापूर, नाशिक, मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यात पावासने हजेरी लावली आहे. उष्णता कमी झाली असून मराठवाडा, विदर्भ, कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील काही तासांत जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. या मान्सूनपूर्व पावसामुळे गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!