मुख्य बातमी

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त चिपळूण पोलीस ठाण्यात पारिजात वृक्षारोपण

चिपळूण : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून चिपळूण पोलीस ठाण्याच्या आवारात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या हस्ते पारिजात वृक्षाचे रोप लावण्यात आले.

या कार्यक्रमाला पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात वृक्षांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक मेंगडे यांनी, “पर्यावरणाचे रक्षण करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करावे,” असे आवाहन केले. तसेच पोलीस दल सामाजिक आणि पर्यावरणीय बांधिलकी जपत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

धार्मिक व आयुर्वेदिक महत्त्व असलेल्या पारिजात वृक्षाच्या लागवडीमुळे पोलीस ठाण्याच्या परिसराच्या सौंदर्यात भर पडणार असून पर्यावरण संवर्धनाचा सकारात्मक संदेशही समाजात पोहोचणार आहे. चिपळूण पोलिसांच्या या उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत व कौतुक करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!