रत्नागिरीत शिवसेनेचा ६०वा वर्धापनदिन उत्साहात

रत्नागिरी : शिवसेना पक्षाचा ६०वा वर्धापनदिन आज (१९ जून) रत्नागिरीत उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त शिवसेना शाखा साळवी स्टॉप येथे शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. वर्धापनदिनाचे औचित्य साधून शिवसेना सचिव व माजी खासदार विनायक राऊत यांच्या जनसंपर्क कार्यालयात श्री सत्यनारायणाच्या महापुजेचे आयोजन केले होते.
रत्नागिरी तालुक्यातील समस्त संघटनेचे प्रमुख पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महापूजेचे तीर्थप्रसाद ग्रहण केल्यानंतर सर्व उपस्थितांनी पक्षाच्या पुढील वाटचालीस आणि संघटन मजबुतीसाठी एकत्र येऊन काम करण्याचा संकल्प केला.
यावेळी रत्नागिरी तालुका समन्वयक शेखर घोसाळे, रत्नागिरी तालुकाप्रमुख मयुरेश्वर पाटील, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, युवासेना जिल्हाधिकारी प्रसाद सावंत, उप तालुकाप्रमुख विजय देसाई, उपशहरप्रमुख नितीन तळेकर, सलील डाफळे, विभागप्रमुख किरण तोडणकर, महिला उप जिल्हा संघटक रशिदा गोदड, महिला तालुका संघटक ममता जोशी, महिला शहर संघटक सेजल बोराटे, सौ. मिताली पवार, गंधाली मयेकर, रेश्मा कोळंबेकर, रूपाली तवसाळकर, स्मिता काटकर, रंजना ठेपसे, सलिना डाफळे, प्रतिमा साळुंखे, प्रियांका सावंत, अवंतिका सावंत, विभागप्रमुख संदेश भिसे, प्रशांत सुर्वे, राजन शेटे, प्रकाश गुरव, तन्वीर मुजावर, बंड्या सुर्वे, फौजिया मुजावर, श्वेता कोरगावकर, साजिद पावसकर, शरद राणे, सुफियान जयगडकर, दिलावर गोदड, योगेश कोरगावकर, बंड्या नांदगावकर, राजू सुर्वे, सिद्धराज सावंतदेसाई, युवा सेना तालुका अधिकारी संदेश नारगुडे, ओंकार कारेकर, सर्फराज शेख आदी शिवसैनिक उपस्थित होते.



