मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

सोहम कदम यांचे सीए परीक्षेत घवघवीत यश

चिपळूण : दसपटी विभागातील टेरव, निम्मेगावचे सुपुत्र सोहम संजीव कदम यांनी सीए परीक्षा उत्तम गुण मिळवून उज्ज्वल यश संपादन केले आहे. कठोर परिश्रम, चिकाटी, सातत्य व अथक प्रयत्नामुळे तसेच कुलस्वामिनी श्री भवानी माता व ग्रामदैवत श्री वाघजाई मातेच्या कृपाशीर्वादाने सोहमने हे घवघवीत यश संपादन केले आहे.

जिल्हा परिषद शाळा टेरवचे मुख्याध्यापक तसेच श्री भवानी वाघजाई मंदिर टेरवचे खजिनदार कै. कृष्णाजी (मास्तर) भिकाजीराव कदम यांचे ते नातू होत. त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल ग्रामस्थ, नातेवाईक, मित्र मंडळी, ग्रामपंचायत टेरव, मंदिर व्यवस्थापन समिती, जय भवानी ग्रामोन्नती मंडळ, जय भवानी एज्युकेशन सोसायटी टेरव, सरस्वती एज्युकेशन ट्रस्ट मुंबई आदींनी सोहमचे अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!