मुख्य बातमी

मेर्वी येथील श्री स्वामी मठात पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

गावखडी : रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी येथे श्री स्वामी समर्थ मठात पौर्णिमेनिमित्त २९ जून रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे

सकाळी ७ वाजता श्री स्वामी समर्थांची पूजा, तर ९ वाजता स्वामी पादुकांवर अभिषेक होईल. दुपारी १२ वाजता पालखी प्रदक्षिणा होईल. १२.३० वाजता आरती, तर दुपारी १ वाजता तीर्थप्रसादाचे वाटप केले जाईल.

भक्तांनी या कार्यक्रमांसाठी उपस्थित रहावे असे आवाहन मेर्वी मठाचे पुजारी सहदेव पावसकर यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!