क्रीडामुख्य बातमी

जिल्हास्तरीय अजिंक्यपद तायक्वांदो क्युरोगी व पूमसे स्पर्धेत राजापूरमधील विद्यार्थ्यांचे यश 

राजापूर : रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन आणि संगमेश्वर तालुका तायक्वांदो अकॅडमी व नगर पंचायत देवरुख तायक्वादो क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय अजिंक्यपद तायक्वांदो क्युरोगी व पूमसे स्पर्धा नुकत्याच ओमेगा गार्डन हॉल देवरुख येथे पार झाली. स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत राजापूर तालुक्यातील ३० खेळाडूंनी सहभाग घेत ९ सुवर्णपदक, ७ रोप्यपदक व ४ कांस्यपदकांची कमाई केली.

याचबरोबर गत नऊ वर्षाची परंपरा कायम ठेवत यावर्षी ही राजापूर तालुक्यातील तीन खेळाडू बेस्ट फायटरचे मानकरी ठरले. यामध्ये सब जुनिअर गटात श्वेत मुकेश नाचरे, कॅडेट गटात नक्ष परशुराम पवार, ज्युनियर गटात परी संजय जड्यार यांनी हा किताब पटकावला .

विविध गटात झालेल्या या स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते खेळाडू असे : आभा प्रभाकर मापेलकर, श्वेत मुकेश नाचरे, नक्ष परशुराम पवार, शुभ्रा विवेक गुरव, परी संजय जड्यार, गार्गी संजय बाकाळकर, रिया मुकेश मयेकर, पूर्वा संदीप राऊत, अंश राजन गुंडये. रौप्य पदक विजेते खेळाडू : मृदुला मोहन घुमे, वेदांत नरेश रहाटे, प्रांजली अजित चव्हाण, मिताली मोहन घुमे, तीर्था गणेश चिपटे, अनुष्का अनिल बाणे, गौरव दीपक धालवलकर. कांस्यपदक विजेते खेळाडू : अर्चित प्रभाकर मापेलकर, हाऊबाई बालाजी जाधव, यज्ञेश जगदीश पेनकर, साईश कमलेश जाधव. सहभागी खेळाडू : निहाल नितीन आंबेरकर, हृदया नवनीत शिंदे, स्वामिनी अजित चव्हाण, यश सचिन चव्हाण, युवराज मंदार पेनकर, द्रोण संदीप चव्हाण, काव्या प्रसाद शिवलकर, वेदिका सुरेश मांडवे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!