मुख्य बातमी

जिल्हा नियोजन समितीवर ११ सदस्यांची निवड; शासन निर्णय प्रसिद्ध

रत्नागिरी : जिल्हा नियोजन समितीवर (DPC) नामनिर्देशित सदस्य आणि विशेष निमंत्रित म्हणून एकूण ११ सदस्यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाने यासंदर्भातील अधिकृत शासन निर्णय अज निर्गमित केला आहे.

या निर्णयानुसार विधानमंडळ/संसद सदस्यांमधून २ नामनिर्देशित सदस्य आणि जिल्हा नियोजनाचा अनुभव असलेले ९ विशेष निमंत्रित सदस्य अशा एकूण ११ जणांना समितीवर संधी देण्यात आली आहे.

नियुक्त सदस्यांची यादी- नामनिर्देशित सदस्य (विधानमंडळ/संसद सदस्यांमधून): आमदार शेखर निकम, आमदार किरण सामंत. विशेष निमंत्रित सदस्य- संतोष लक्ष्मण जैतापकर (नरवण, ता. गुहागर), सचिन मनरंजन जाधव (दापोली), प्रसाद प्रभाकर सावंत (मारळ, ता. संगमेश्वर), विलास (बंधू) रामचंद्र वारिसे (गोळप, ता. जि. रत्नागिरी), संदेश (बापू) मनोहर शेट्ये (साखरपा, ता. संगमेश्वर), अमित गजानन केतकर (कोंडगांव, साखरपा, ता. संगमेश्वर), केदार भिकाजी साठे (जालगांव, ता. दापोली), अजय शांताराम बिरवटकर (पोयनार अलाटीवाडी, ता. खेड), सचिन श्रीकांत वहाळकर (जि. रत्नागिरी).

नवनियुक्त सदस्यांचा कार्यकाळ हा राज्य शासनाकडून हे नामनिर्देशन रद्द होईपर्यंत किंवा सध्याच्या मंत्रिमंडळाच्या पदावधीपर्यंत (यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत) अबाधित राहणार आहे. उपसचिव नि. भा. खेडकर यांच्या स्वाक्षरीने हा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!