मुख्य बातमी

गणराज क्लबचा तायक्वांदो खेळाडूंनी गुरुवंदना

रत्नागिरी : गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून गणराज क्लब साळवी स्टॉप (रत्नागिरी) येथे सर्व विद्यार्थ्यांकडून गुरुवर्यांप्रति गुरुपाद्यपूजन तसेच गुरुवंदनेचे समारंभपूर्वक आयोजन करण्यात आले होते.

गणराज क्लब तायक्वांदो रत्नागिरी येथील सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुवर्यांप्रति कृतज्ञता व्यक्त करताना छोटी भेटवस्तू तसेच स्वनिर्मित शुभेच्छाकार्ड अर्पण करून अनोखी गुरुवंदना सादर केली. गुरुपौर्णिमेनिमित्त क्लब मध्ये महर्षी व्यास यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी बरखा संदेश, दूर्वा हातीसकर,आद्या रसाळ, केशर शेरे, त्रिशा मयेकर, श्रेष्ठ विलनकर, गौरी विलनकर, आहाना रसाळ ध्रुवी मयेकर, विधी दुबे, अन्वी पोळेकर, शार्वी महाजन, तीर्थ मकवाना या बालकांनी आपल्या मधुर वाणीतील छोट्या भाषणांनी गुरुवर्यांची मने जिंकली.

गणराज क्लब साळवी स्टॉप रत्नागिरी साजऱ्या झालेल्या गुरुपौर्णिमा विशेष कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीनियर खेळाडू श्रेष्ठ विलनकर व बरखा संदेश यांनी केले. हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नीरज मकवाना, अथर्व मुरकुटे, अर्णव मुरकुटे, ध्रुव देशमुख, विहान साप्ते, प्रदेश शेरे आदींनी मेहनत घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!