महाराष्ट्रमुख्य बातमी

कराडमध्ये २२ व २३ ऑगस्टला राज्यस्तरीय खो-खो पंच शिबिर  

प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव यांची माहिती

मुंबई : महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे राज्यस्तरीय पंच शिबीर २२ व २३ ऑगस्ट २०२६ रोजी कराड येथे होणार आहे. या शिबिरात पूर्णवेळ उपस्थित राहणाऱ्या पंचांना आगामी राज्य अजिंक्यपद स्पर्धांसाठी नियुक्ती दिली जाणार आहे. द ॲमेच्युर खो-खो असोसिएशन, सांगली आणि रयत शिक्षण संस्थेचे सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज, कराड यांच्या संयुक्त विद्यमाने या दोन दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, असे महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव यांनी सांगितले.

राज्यातील पंचांना नियमांतील अद्ययावत बदल, निर्णयक्षमतेतील अचूकता आणि स्पर्धांतील व्यावसायिकता यांचा अनुभव देण्यासाठी हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरासाठी सर्व जिल्हा खो-खो संघटनांअंतर्गत कार्यरत असलेले तसेच राज्य किंवा राष्ट्रीय पंच परीक्षा उत्तीर्ण झालेले सर्व पंच पात्र असणार आहेत. पंचगिरीची गुणवत्ता अधिक उंचावण्यासाठी आणि राज्यभर एकसमान निर्णयप्रक्रिया विकसित करण्याच्या उद्देशाने या शिबिराला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे पात्र पंचांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन असोसिएशनतर्फे करण्यात आले आहे.

शिबिरात सहभागी होण्यासाठी ऑनलाइन नोंदणी अनिवार्य करण्यात आली असून, नोंदणी केलेल्या पंचांनाच प्रवेश दिला जाणार आहे. नोंदणीची अंतिम मुदत १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे.

शिबिराबाबत अधिक माहितीसाठी इच्छुक पंचांनी डॉ. प्रशांत इनामदार (९७६२८९७३७३ / ७७०९१७३७६७) किंवा प्रा. सचिन चव्हाण (९९२३२१५००७) यांच्याशी संपर्क साधावा, असे असोसिएशनतर्फे कळविण्यात आले आहे.

शिबिराचे वेळापत्रक

स्थळ : रयत शिक्षण संस्थेचे सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज, कराड

दिनांक : २२ व २३ ऑगस्ट २०२६

उपस्थितीची वेळ : २२ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!