मुख्य बातमी

पटवर्धन हायस्कूलच्या विद्यार्थिनींचे निबंध स्पर्धेत घवघवीत यश

रत्नागिरी : महिला व बाल विकास विभाग मान्यताप्राप्त सखी निवास (नोकरी करणाऱ्या महिलांचे वसतिगृह), भारतीय कष्टकरी रयत सेवा संस्था, लांजा यांच्या वतीने ‘हर घर तिरंगा-२०२६’ या उपक्रमांतर्गत आयोजित निबंध स्पर्धेत पटवर्धन हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश संपादन केले.

या स्पर्धेत गौरी जयेश धुमक हिने प्रथम क्रमांक, तनुजा रामचंद्र मासाळ हिने द्वितीय क्रमांक, तर आराध्या सचिन गिरी हिने तृतीय क्रमांक पटकावला. तसेच उन्नती उपेंद्र बंदरकर आणि ओवी विनोद सावंत यांनी उत्तेजनार्थ क्रमांक मिळवला. या यशस्वी विद्यार्थिनींना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

विद्यार्थिनींच्या या उल्लेखनीय यशाबद्दल पटवर्धन हायस्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती जानकी घाटविलकर, उपमुख्याध्यापक श्री. रुपेश पंगेरकर आणि पर्यवेक्षक श्री. अमर लवंदे यांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले. तसेच संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे . विद्यार्थ्यांच्या यशामुळे शाळेच्या शैक्षणिक व सहशालेय उपक्रमांच्या लौकिकात भर पडली असून, इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!