मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा
रत्नागिरीचे प्रांतधिकारी जीवन देसाई यांचे चिरंजीव अभिनव आणि सुकन्या मनस्वी यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत उज्ज्वल यश
आबलोलीच्या सुयश कॉम्प्युटर सेंटरच्या वतीने सत्कार

आबलोली (संदेश कदम) : रत्नागिरीचे प्रांताधिकारी जीवन देसाई यांचे चिरंजीव अभिनव देसाई (इयत्ता सातवी) आणि सुकन्या मनस्वी देसाई (इयत्ता चौथी) यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत मिळवलेल्या उज्वल यशाबद्दल आबलोलीतील सुयश कॉम्पुटर सेंटरचे संचालक संदेश साळवी यांनी रत्नागिरी येथे अभिनव देसाई याचा शाल घालून पुष्पगुछ आणि भेट वस्तू देत सत्कार करून शुभेच्छा दिल्या. तसेच संचालिका सौ. सावी साळवी यांनी मनस्वी देसाई हिचा शाल घालून पुष्पगुच्छ आणि भेट वस्तू देत सत्कार करून शुभेच्छा दिल्या. यावेळी सौ. मयुरी देसाई यांनी संदेश साळवी, सौ. सावी साळवी यांचे स्वागत केले.




