मुख्य बातमी

आनंदीबाई अभ्यंकर बालविद्यामंदिरमध्ये दहीहंडी

रत्नागिरी : दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमती आनंदीबाई परशुराम अभ्यंकर बालविद्यामंदिरात दहीहंडीचा कार्यक्रम उत्साहात साजरा झाला. आपल्या बाललीलांनी संपूर्ण गोकुळाला मंत्रमुग्ध करणाऱ्या कृष्णजन्माष्टमीचा सण साजरा करण्यासाठी राधा-कृष्णाच्या वेशभूषेत बालगोपाल उपस्थित होते.

खेळघर, छोटा गट व मोठ्या गटातील मुलांनी कृष्ण गीतावर सुरेख नृत्य सादर केले. त्यानंतर दहीहंडी फोडून सर्वांना दहीपोह्याच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेचे सेक्रेटरी राजीव गोगटे आणि बालविद्यामंदिरच्या व्यवस्थापिका सौ. मंजिरी आगाशे व माजी मुख्याध्यापिका सौ. मीना रिसबूड उपस्थित होत्या. त्याचप्रमाणे कृष्णजन्माष्टमी आणि श्रावणी शुक्रवारचे औचित्य साधून हळदीकुंकू समारंभ करण्यात आला. मुख्याध्यापिका सौ. प्रज्ञा काळे, सर्व शिक्षिका, सेविका, पालकांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!