Uncategorized

दुर्गम भागात कायदेविषयक जनजागृती शिबिर संपन्न

लांजा : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार व प्रभारी प्रमुख जिल्हा न्यायाधीश विनोद जाधव यांच्या आदेशानुसार रत्नागिरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने तालुक्यातील माचाळ येथे विधी साक्षरता शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव राजेंद्र आर. पाटील, गटविकास अधीकारी लांजा श्री. एच. बी. गिरी, तहसीलदार श्रीमती प्रियांका ढोले, जेष्ठ विधिज्ञ संकेत तुकाराम ढवळ, श्री. झिमन, माचाळ मुचकुंडी पर्यटन विकास सेवा सहकारी संस्थेचे संस्थापक विवेक सांवत, सरपंच श्री. गाडे, विस्तार अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, तलाठी, मंडळ अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

या कार्यक्रमात श्री. ढवळ यांनी ग्रामस्थांना कुळकायद्याविषयी माहिती सांगितली. तहसीलदार श्रीमती ढोले यांनी महसूल खात्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती ग्रामस्थांना दिली. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणकडून राबविण्यात येणाऱ्या योजना मोफत कायदेविषय सल्ला व सहाय्य याबाबत श्री. पाटील यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.

सुत्रसंचालन श्री. कांबळे यांनी केले. सरपंच श्री. गाडे यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!