Uncategorized
हातीस उरुसामध्ये संपर्क युनिक फाउंडेशन देणार विनामूल्य रुग्ण सेवा

रत्नागिरी : कोकणातील सुप्रसिद्ध पीर बाबर शेख यांचा उरुस शहरानजीकच्या हातीस गावात दरवर्षी भरतो. या उरुसादरम्यान येथील संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ च्या वतीने विनामूल्य रुग्ण सेवा पुरवली जाते. यंदा ही संस्थेच्या वतीने उरुसदरम्यान मोफत रुग्णसेवा दिली जाणार आहे.
हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक समजल्या जाणाऱ्या या उरुसामध्ये दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक श्रद्धेने उपस्थित असतात. यंदा हा उरूस २ आणि ३ फेब्रुवारी रोजी होणार आहे.
यासाठी येणाऱ्या भाविकांना आकस्मिक आजार किंवा किरकोळ उपचारासाठी दरवर्षी संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी गेली ८ वर्षे तेथे दोन दिवस भाविकांची विनामूल्य सेवा करीत असते.यंदाही ही सेवा सुरू राहणार असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले आहे.



