Uncategorized

ग्रामीण भागातील जनतेचे प्रश्न सोडवून त्यांचा विकास करण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात

धोपेश्वर पंचायत समिती गणातील महायुतीचे उमेदवार अभिजित गुरव 

राजापूर : ग्रामीण भागाचा सर्वांगिण विकास हाच ध्यास घेऊन आपण सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करत आलो आहोत. माझ्या ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवून त्यांना न्याय देण्यासाठी त्यांचा विकास करण्यासाठी आपण धोपेश्वर पंचायत समिती गणातून महायुतीचा उमेदवार म्हणून निवडणुकीच्या मैदानात उतरलो असल्याचे महायुतीचे धोपेश्वर पंचायत समिती गणाचे उमेदवार अभिजीत गुरव यांनी सांगितले.

महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून महायुतीचे सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते आपल्यासाठी एकदिलाने काम करत असून, आपला विजय निश्चित असल्याचे गुरव यांनी सांगितले. भाजपाचे निष्ठावान कार्यकर्ते असलेले अभिजित गुरव हे एक आक्रमक नेतृत्व म्हणून ओळखले जातात, भाजपाचे तालुका अध्यक्ष म्हणून त्यांनी तालुक्यात चांगली कामगिरी केली आहे. तर सध्या ते भाजपाचे जिल्हाउपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. आपल्या या पदाच्या माध्यमातून त्यांनी भाजपा संघटना बांधणीसाठी महत्त्वाचे योगदान दिले आहे.

सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी प्रसंगी रस्त्यावर उतरून न्याय मिळवून देणारा एक धडाडीचा कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे. एखाद्या सर्वसामान्य माणसाला वा जनतेच्या प्रश्नाला प्रशासकीय पातळीवर न्याय वा मदत मिळण्यास उशीर झाला, तर स्वत: वैयक्तीकरित्या त्या माणसाला मदत करून हातभार लावण्याचे काम गुरव यांनी केले आहे. त्यामुळे आपला हक्काचा माणूस अशी त्यांची धोपेश्वर गणातच नव्हे तर तालुक्यात ओळख आहे.

कोरोना काळात त्यांनी अनेकांना मदतीचा हात दिला आहे. पक्षाच्या माध्यमातून ग्रामीण भागात अनेक विकास कामांना निधी उपलब्ध करून देताना त्यांनी ग्रामीण भागातील विकासाला गती देण्यासाठी केलेले प्रयत्न कौतुकास्पद असेच आहेत. त्यामुळे अभिजित गुरव यांच्याकडे काम म्हणजे १०० टक्के होणारच असा जनतेमध्ये विश्वास आहे.

ग्रामीण भागातील विकासासाठी आपण या निवडणुकीच्या रिंगणात उतरलो असल्याचे नमूद करत भविष्यात धोपेश्वर पंचायत समिती गणातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवून त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले. आजही या भागात रस्ते, विज, पाणी, स्वच्छता यांसाख्या समस्या आहेत, त्या आपण सोडवूच पण भविष्यात या गणाच्या विकासाचा एक आराखडा तयार करून या गणाचा सर्वांगीण विकास करण्याचा आपला संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!