मुख्य बातमी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला उद्योग मंत्री उदय सामंत यांचा प्रतिसाद
इलेक्ट्रिक कार वापरण्यास सुरवात

रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर राज्यात उद्योग मंत्री उदय सामंत यांनी इलेक्ट्रिक कार वापरण्यास सुरवात केली.
इंधन बचत संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना इलेक्ट्रिक वाहन वापरण्याचे आवाहन केले होते. त्याची अंमलबजावणी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी प्रत्यक्ष कृतीतून केली आहे. तसेच सामंत यांनी त्यांचा कारचा ताफा कमी केला आहे. त्यांच्या स्वतःच्या कारसह आता त्यांनी त्यांच्या सुरक्षेसाठी असलेल्या दोन कारही आता इलेक्ट्रिक कार वापरत आहेत.



