मुख्य बातमी

संविधान हत्या दिवसानिमित्त रत्नागिरीत भाजपतर्फे आज विशेष कार्यक्रम

रत्नागिरी : भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील काळा अध्याय मानल्या जाणाऱ्या २५ जून १९७५ रोजी लागू करण्यात आलेल्या आणीबाणीच्या स्मृती जागवण्यासाठी आणि लोकशाही मूल्यांच्या संरक्षणाचा संकल्प दृढ करण्यासाठी भारतीय जनता पार्टी, रत्नागिरी दक्षिणच्या वतीने ‘संविधान हत्या दिवस’ (आणीबाणी दिन – ५१ वर्षे) निमित्त विशेष प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम आज (२५ जून) सकाळी ११ वाजता हॉटेल विवा एक्झिक्युटिव्ह, मारुती मंदिर, रत्नागिरी येथे होणार आहे.

कार्यक्रमात डॉ. संजय केतकर आणि विवेक भावे हे प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. आणीबाणीच्या काळातील घटनांचा आढावा, लोकशाहीवरील त्याचे परिणाम तसेच संविधानिक मूल्यांचे महत्त्व यावर ते आपले विचार मांडणार आहेत.

या कार्यक्रमास खासदार व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायणराव राणे तसेच भारतीय जनता पार्टी, रत्नागिरी दक्षिणचे जिल्हाध्यक्ष प्रशांत बबन यादव यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

कार्यक्रमाचे संयोजन बाबा परुळेकर यांनी केले असून अभय चितळे व राजू भाटलेकर हे सहसंयोजक म्हणून कार्यरत आहेत.

लोकशाहीच्या रक्षणाचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!