गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात कीटकजन्य आजाराबाबत जनजागृती कार्यक्रम

रत्नागिरी : जिल्हा हिवताप कार्यालय, राष्ट्रीय कीटकजन्य रोग निर्मूलन कार्यक्रम अंतर्गत, गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने, रत्नागिरी शहर बसस्थानक येथे पथनाटय सादरीकरण करण्यात आले.

यावेळी जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. संतोष यादव, आरोग्य पर्यवेक्षक श्री. एल. जी.पुजारी, आरोग्य पर्यवेक्षक आर. एस. जाधव, कीटकसमहारक व्ही. एस. ढवळे, एस. आर. शेलार, आरोग्य निरीक्षक एस. जी. राणे, आरोग्य निरीक्षक डी. व्ही. गुरव, आरोग्यसेवक एम. एम .साळवी, एन. एन. डंबे, एस. जे. ढेकणे, एस .एस. बिरांजे, क्षेत्रीय कर्मचारी व्ही. व्ही. सावंत
व गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे सचिन संगारे व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी कीटकजन्य आजाराबाबत जनजागृतीसाठी पँपलेट वाटप, ग्रुप टॉक, पोस्टर चिकटवणे आदी उपक्रम राबविण्यात आले.



