मुख्य बातमी

राजापूर आयटीआयमध्ये मानधन तत्वावर टंकलेखन लिपिक पदासाठी भरती

१५ एप्रिलपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

राजापूर : येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत केंद्र शासन पुरस्कृत पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप अंतर्गत संस्था व्यवस्थापन समिती (IMC) च्या कामाकाजासाठी तात्पुरत्या स्वरूपात मानधन तत्वावर टंकलेखन लिपिक (Data Entry Operator) नेमण्याचे आहे. गरजू उमेदवारांनी संस्थेच्या पत्त्यावर १५ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज करावेत, असे आयएमसी ऑफ आयटीआय राजापूरचे सचिव टी. एस. मिसाळ यांनी केले आहे.

पदाचे नाव : टंकलेखन लिपिक, वय वर्षे २१ ते ३८ वर्षापर्यंत, किमान वाणिज्य शाखेतील पदवी, संगणक ज्ञान, टॅली, टंकलेखन मराठी-इंग्रजी, ऑनलाईन कामकाज हातळण्याचे ज्ञान ही शैक्षणिक अर्हता आवश्यक, किमान २ वर्षाचा शैक्षणिक अर्हतेनुसार अनुभव आवश्यक. दरमहा १२ हजार रुपये व ५ टक्के वार्षिक दरवाढ असे वेतन असेल.

अटी व शर्ती

कार्यालयीन कामकाजासाठी प्रवास करावा लागेल. ११ महिने नियुक्ती कालावधी व कामकाज समाधानकारक असल्यास पुढील २ वर्षासाठी प्रत्येकी ११ महिन्याची नियुक्ती. कोणत्याही प्रवर्गातील उमेदवारास समान संधी. दरवर्षी ११ महिन्याचे बंदपत्र देणे अनिवार्य राहील. कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याविषयी तरतूद नाही. अनुभव प्रमाणपत्र अथवा सेवेत कार्यरत असलेला कोणताही दाखला अथवा प्रमाणपत्र देण्यात येणार नाही. उपरोक्त योजना केंद्र शासन पुरस्कृत असल्याने योजना चालू असे पर्यंतच सेवेत कार्यरत ठेवण्यात येईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!