माजी खासदार विनायक राऊत आज, उद्या जिल्हा दौऱ्यावर

रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार तथा शिवसेना नेते सचिव विनायक राऊत हे बुधवारी (२१ मे) व गुरुवारी (२२ मे) रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.
त्यांचे नियोजित कार्यक्रम असे : २१ मे रोजी दुपारी ३.३० वाजता सिंधुदुर्गवरून संगमेश्वरकडे प्रयाण, सायंकाळी ६.३० वाजता मौजे कर्ली देवरुख येथील ज्येष्ठ शिवसैनिक व मुंबई येथील शाखाप्रमुख कै. मोहन चाळके यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट (ता.संगमेश्वर), सोयीनुसार शासकीय विश्रामगृह माळनाका रत्नागिरी येथे आगमन व मुक्काम.
गुरुवारी (२२ मे) सकाळी ११ वाजता रत्नागिरी जिल्ह्यातील प्रस्तावित बीएसएनएल मोबाईल टॉवरच्या आढावा बैठकीला उपस्थिती, स्थळ : जिल्हा प्रबंधक, भारतीय दूरसंचार विभाग, जिल्हा सत्र न्यायालय समोर, रत्नागिरी. दुपारी २ वाजता शिवसेना उपनेत्या तथा महिला आर्थिक विकास महामंडळ मा.अध्यक्षा सौ. ज्योती ठाकरे यांच्या समवेत रत्नागिरी जिल्ह्यातील कोकणवासीयांसाठी फणस एक व्यवसायातील संधी अनेक या कार्यशाळेला उपस्थिती, स्थळ : दैवज्ञ भवन हॉल, नाचणे रोड, रत्नागिरी. सायंकाळी ५.४० वाजता २२२३० वंदे भारत एक्सप्रेसने रत्नागिरी रेल्वेस्थानक येथून मुंबईकडे रवाना.



