मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हाराजकारणशैक्षणिक

कोकणात मुसळधार पाऊस असल्याने शाळा उशिराने सुरू करा

बळीराजा सेनेचे जिल्हाध्यक्ष पराग कांबळे यांची आग्रही मागणी

आबलोली (संदेश कदम) : उद्यापासून (१६ जून) नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात होत आहे; मात्र येत्या ५ दिवसांत राज्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने सरकारने शाळा सुरू करू नयेत. शाळा पुढील आठवड्यात सुरू कराव्यात, अशी आग्रही मागणी बळीराज सेना पक्षाचे जिल्हा अध्यक्ष पराग कांबळे यांनी सरकारकडे केली आहे.

दोन महिन्याची सुट्टी संपून आता १६ जूनपासून शाळा  सुरू होत आहेत; मात्र कोकणात व राज्यात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे कोणताही धोकादायक प्रकार घडू नये यासाठी सरकारने उशिराने शाळा सुरू कराव्यात, अशी आग्रही मागणी सरकारकडे बळीराज सेनेचे जिल्हा अध्यक्ष पराग कांबळे यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!