चिपळूण तालुक्याला सतर्कतेचा इशारा
११ ठिकाणी नगरपालिका, महसूल, पोलीस व NDRF यांची पथके तैनात

चिपळूण : तालुक्यातील सर्व नागरिकांना पुढील ८ तास सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. सध्या वशिष्ठी नदीची पाणी पातळी ५ः८० मी म्हणजेच इशारा पातळीवर आहे. कोळकेवाडी धरणाची पाणी पातळी १३४.७० मी. आहे. कोळकेवाडी धरणाच्या परिसरात काल सकाळी ८ पासून आज ८ पर्यंत म्हणजे २४ तासामध्ये २२० मिमी पाऊस पडलेला आहे. आज सकाळी ८ ते ११ यावेळेत ७७ मिमी पाऊस पडलेला आहे. सर्व मशीन बंद केलेल्या आहेत. सकाळी ९ः५० वा भरती होती आता दुपारी ३ः५० वा ओहोटी आहे. पुढील अर्धा तास महत्त्वाचा आहे.
११ ठिकाणी नगरपालिका, महसूल, पोलीस व NDRF यांची पथके ठेवण्यात आलेली आहेत. ५ ठिकाणी बोटी ठेवण्यात आलेल्या आहेत. बाजारपेठ, मुरादपूर, चिंचनाका , वडनाका, आईस फॅक्टरी, पेठमाफ इंडियन जीम या भागात एक ते दीड फूट पाणी आलेले आहे. नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. कोळकेवाडी धरण्याच्या मशीन ५.३० वा बंद करण्यात आलेल्या होत्या परंतु कोळकेवाडी धरणाची पाणी पातळी लाढत असल्याने १२ः३० वा एक मशीन सुरू करावी लागेल व ते पाणी शहरामध्ये १ः३० वा येईल. दसपटी भागातील पावसाचा जोर कमी झालेला आहे ही दिलासादायक बाब आहे.



