मुख्य बातमी

कर्तव्य बजावणार्‍या पोलीस कर्मचार्‍यावरच तरुणाने केला हल्ला

रत्नागिरी : शहरानजीकच्या मयेकरवाडी शिरगाव येथे कायदेशिर कर्तव्य बजावणार्‍या पोलिस कर्मचार्‍यावरच हल्ला चढवणार्‍याला अटक करण्यात आली. ही घटना सोमवार 8 सप्टेंबर रोजी रात्री ८.३० ते ९.३० यावेळेत घडली. याप्रकरणी संशयित अमोल अवधुत मयेकर (रा.मयेकरवाडी शिरगाव, रत्नागिरी) याला ताब्यात घेण्यात आले आहे.

त्याच्या विरोधात जखमी पोलीस कर्मचारी यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, सोमवारी रात्री संशयित अमोल मयेकर हा त्याचा चुलत भाऊ समीर शशिकांत मयेकर याला सुरा काढून शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी देत होता. त्यामुळे घाबरलेल्या समीरने शहर पोलीस ठाण्यात फोन करून मदत मागितली.

शहर पोलिसांची डायल ११२ ही गाडी तातडीने घटनास्थळी रवाना झाली. फिर्यादी पोलिस कर्मचारी यांनी कायदेशीर कारवाई करण्याच्या उद्देशाने संशयिताला डायल ११२ गाडीत मागे बसवून शहर पोलीस ठाण्यात येत असताना संशयित अमोल मयेकरने त्याच गाडीत मागे ठेवलेले हेल्मेट फिर्यादी पोलीस कर्मचार्‍याच्या डोक्यात जोरात मारले. यात त्यांच्या दातांना आणि तोंडाला जबर मार लागल्याने ते जखमी झाले. फिर्यादी हे कायदेशीर कर्तव्य करत असताना कर्तव्यापासून परावृत्त करण्यासाठी संशयिताने त्याना शिवीगाळ करून त्यांच्यावर हल्ला करून दुखापत केली. तसेच मनाई आदेशादरम्यान सुरा बाळगून सार्वजनिक ठिकाणी आरडाओरडा केली म्हणून त्याला अटक करण्यात आली. मंगळवारी संशयिताला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याची जामिनावर मुक्तता केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!