माकड आणि केल्डी यांचा उपद्रव रोखण्यासाठी विशेष मोहीम राबवावी
शासनाने आंबा फळ नुकसानीची नोंद पिक विमामध्ये समाविष्ट करण्याची मिलिंद चाचे यांची आग्रही मागणी

आबलोली (संदेश कदम) : माकड आणि केल्डी यांच्या बंदोबस्तासाठी विशेष मोहीम राबवून आंबा बागायतदार, शेतकऱ्यांचे नुकसान कमी करण्याचा प्रयत्न करावा. तसेच शासनाने आंबा फळ पिकाच्या नुकसानीची नोंद पीक विमामध्ये समाविष्ट करावी, अशी आग्रही मागणी काँग्रेसचे माजी गुहागर तालुकाध्यक्ष मिलिंद आत्माराम चाचे यांनी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक, पालकमंत्री उदय सामंत आणि रत्नागिरीचे जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे.
आंबा फळ पिकामुळे महाराष्ट्र शासनाला आंबा बागायतदारांकडून चांगल्याप्रकारे महसूल मिळतो; परंतु रत्नागिरी जिल्ह्यातील बागायतदारांचे वन्य प्राणी, माकड आणि केल्डी तसेच अवेळी येणाऱ्या पावसामुळेही फार मोठे नुकसान होत असते. माकड आणि केल्डी यांचा वाढलेला उपद्रव यामुळे शेतकरी चिंतेत पडला असून आंबा बागायतरांना आपल्या पिकाच्या नुकसानीसाठी डोक्यावर हात मारण्याची वेळ येते. हातात काही पीक येत नाही हा त्रास आंबा बागायतदार शेतकऱ्यांना गेली कित्येक वर्ष सहन करावा लागतो आहे. त्यामुळेच महाराष्ट्र वन विभागाने जानेवारी ते मे महिन्यामध्ये माकड आणि केल्डी यांच्या बंदोबस्तासाठी विशेष मोहीम राबवून आंबा बागायतदार शेतकरीचे नुकसान कमी करण्याचा प्रयत्न करावा. तसेच शासनाने आंबा या फळ पिकाच्या नुकसानीची नोंद पीक विम्यामध्ये समाविष्ट करावी, अशी मागणी काँग्रेसचे माजी गुहागर तालुकाध्यक्ष मिलिंद चाचे यांनी केली ahem राज्याचे वनमंत्री गणेश नाईक, पालकमंत्री उदय सामंत आणि रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे. तशा सूचना पिक विमा कंपनीला कराव्यात, अशी विशेष सूचनाही या निवेदनात मिलिंद चाचे यांनी केली आहे.



