प्रलंबित कामे मार्गी न लागल्यास शिवसेना स्टाईलने उत्तर देणार
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा इशारा

गुहागर : नगरपंचायतीच्या माध्यमातून चालू असलेली विकासकामे अद्याप अपूर्ण असून, ही कामे लवकरात लवकर मार्गी लागावी. तसेच शहरातील खड्डे, नालेसफाई आणि सुमारे २ कोटी खर्च झालेल्या स्ट्रीट लाईटचे खांब बसवून दोन वर्षे झाली तरी त्यावर लाईट बसलेली नाही ही व अशी सर्व प्रलंबित कामे पूर्ण व्हावी यासाठी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी श्री. चव्हाण व इतर संबंधित अधिकारी यांना कामाबाबत सूचना दिल्या आहेत. ही कामे पूर्ण झाली नाही, तर भविष्यात आम्ही गुहागर शहरातील जनतेच्या हक्कासाठी शिवसेना स्टाईलने आंदोलन करू, अशा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे देण्यात आला आहे.
हे सर्व प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावू, असे आश्वासन यावेळी मुख्याधिकारी श्री. चव्हाण दिले आहे.
यावेळी गुहागर शहर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शहर प्रमुख सिद्धिविनायक जाधव, माजी नगराध्यक्ष सौ. स्नेहा वरांडे, महिला संघटिका सौ. पारिजा कांबळे, युवासेना शहर प्रमुख राज विखारे, विभाग प्रमुख शशिकांत शिंदे गुरुजी, प्रभुना देवळेकर, शब्बीर माहीमकर, समीर कनगुटकर, शाखाप्रमुख राहुल जाधव, आदेश मोरे, कल्पेश बागकर, सचिन कचरेकर, पराग मोरे, सिद्धेश पावसकर, विनोद देवाळे, चेतन जांगळी आदी उपस्थित होते.



