बारकू शांताराम बेंडल यांची मध्यवर्ती कुणबी युवक मंडळाच्या सहसचिव पदी नियुक्ती

आबलोली (संदेश कदम) : खेरशेत (ता. चिपळूण) गावचे सुपुत्र बारकू शांताराम बेंडल यांची रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर आणि मुंबई मध्यवर्ती कुणबी युवक मंडळावर सहसचिव पदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. यानिमित्त सम्यक युवा मंच खेरशेतचे संस्थापक अध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य ॲड. प्रशितोष सुनील कदम यांनी बारकू बेंडल यांना सन्मानित करून शुभेच्छा दिल्या.
बारकू बेंडल यांनी मुंबई विद्यापीठातून एमए (राज्यशास्त्र) पदवी संपादन केली असून, ते मुंबई येथे बॅंकिंग क्षेत्रात कार्यरत आहेत. २०१६ पासून सामाजिक क्षेत्रातही त्यांचे योगदान असून युवा अध्यक्ष माधव कांबळे, चिपळूण तालुका अध्यक्ष चंद्रकांत कोकमकर, अमेय खापरे यांच्या मौलिक मार्गदर्शनाखाली ते सामाजिक कार्यात स्वतःला तन, मन, धनाने झोकून देत आहेत. श्री. बेंडल यांच्यावर सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहेत.



