चंद्रकांत बाईत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विज्ञान, वाणिज्य शाखेचा निकाल १०० टक्के

आबलोली (संदेश कदम) : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (HSC) परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, यात गुहागर तालुक्यातील आबलोली येथील चंद्रकांत बाईत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विज्ञान आणि वाणिज्य शाखेचा निकाल १०० टक्के लागला आहे. तर कला शाखेचा निकाल ९२.५९ टक्के लागला आहे.
विज्ञान शाखेमधून परीक्षेसाठी ११ विद्यार्थी बसले होते ते सर्व ११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या शाखेतून कुणाल संतोष मुंडेकर हा ७४.५० टक्के गुण मिळवून प्रथम आला. वैभव वसंत पाटील हा ६६.५० टक्के गुण मिळवून द्वितीय, तर प्राजक्ता राजेश वरेकर ही ६२.८३ टक्के गुण मिळवून तृतीय आली. वाणिज्य शाखेमधून ३३ विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. हे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, यात प्रचिता सुधाकर रसाळ ही ८८.१७ टक्के गुण मिळवून प्रथम आली. श्रृती महेंद्र तावडे ही ८७.३३ टक्के गुण मिळवून द्वितीय, तर ऋतुजा दिनेश वेलुंडे ही ८०.३३ टक्के गुण मिळवून तृतीय आली. कला शाखेमधून २७ विद्यार्थी परिक्षेसाठी बसले होते. यापैकी २५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, या शाखेतून दीक्षा सुभाष शीतप हिने ७७.५० टक्के गुण मिळवून प्रथम आली. समीक्षा संतोष कोकरे ही ६४.१७ टक्के द्वितीय आली असून, स्वाती कोकरे ही ६०.५० टक्के गुण मिळवून तृतीय आली.
लोकशिक्षण मंडळ आबलोली संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत बाईत, कार्याध्यक्ष सचिन बाईत, मुख्याध्यापक डी. डी. गिरी यांच्यासह शाळा व्यवस्थापन कमिटी पदाधिकारी व सदस्य तसेच शिक्षक, कर्मचारी आणि विविध सामाजिक, धार्मिक संघटनांच्या पदाधिकारी यांनी या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, पालकांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.



