महाराष्ट्रमुख्य बातमी

दोन आठवडे आधीच मान्सून केरळमध्ये धडकणार

मुंबई : यंदा वेळेच्या आधीच मान्सून दाखल होणार आहे. हवामान अभ्यासकांच्या प्राथमिक अंदाजानुसार यंदा मोसमी पाऊस वेळेच्या आधीच निकोबार बेटांवर दाखल होण्याची शक्यता आहे. केरळमध्ये १ जून रोजी मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे, तर मुंबईमध्ये मान्सूनच्या सरी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोसळण्याची शक्यता आहे.

यंदा देशात १०५ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. केरळमध्ये मान्सून १ जून २०२५ रोजी दाखल होईल, तर मुंबईसह महाराष्ट्राच्या किनारी भागात ८ जूनपर्यंत मान्सूनचा पाऊस धडकणार आहे. यंदा एल निनोचा प्रभाव नसल्याने आणि ला निना सारख्या अनुकूल वातावरणामुळे पावसाचे प्रमाण चांगले राहील, असे सांगण्यात येत आहे. दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेटे आणि आग्नेय बंगालच्या उपसागरात १९ किंवा २० मे रोजी मान्सूनपूर्व वातावरण तयार होईल. त्यामुळे अंदमान आणि निकोबार बेटांवर लवकर कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊ शकतो.

त्यामुळे मान्सूनच्या प्रगतीला वेग येणार आहे. यंदा कोकण, मराठवाडा आणि विदर्भात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तर मध्य महाराष्ट्रात सामान्य पाऊस अपेक्षित आहे. उत्तर गोलार्धातील यंदा कमी हिमवृष्टी आणि न्यूट्रल इंडियन ओशन डायपोल (IOD) यामुळेही मान्सूनला पोषक वातावरण आहे. मुंबईत मान्सूनचा पाऊस साधारणपणे जूनच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होतो. यंदा हवामान विभागाने ७ ते ८ जूनच्या दरम्यान मुंबईत मान्सूनच्या पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही जास्त पावसामुळे खरीप पिकांना फायदा होईल, तसेच धरणे आणि जलाशयांची पाणीसाठवणूक वाढण्याची आशा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!