क्रीडामुख्य बातमीराजकारण

मुरुडवाडा क्रिकेट मंडळ आयोजित अंडरआर्म लिग क्रिकेट स्पर्धेस सुरुवात

रत्नागिरी : भारतीय जनता पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण पुरस्कृत क्रिकेट मंडळ आयोजित भव्य नाईट अंडरआर्म लिग क्रिकेट स्पर्धेला ५ मे रोजी सुरुवात झाली असून, स्पर्धेचा उद्घाटन सोहळा नुकताच उत्साहात झाला.

भाजपाचे अनिकेत पटवर्धन यांच्या सहकार्यामुळे आणि जिल्हाध्यक्ष राजेश सावंत आणि माजी शहराध्यक्ष राजन फाळके यांच्या पाठपुराव्याने ही स्पर्धा संपन्न होत आहेत. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, राजेंद्र फाळके, शहराध्यक्ष दादा ढेकणे, नितीन जाधव, संतोष बोरकर, सौ. पल्लवी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी उपस्थिती दाखविली.

स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी अनेकजण मेहनत घेत असून, ही स्पर्धा ९ मेपर्यंत चालणार आहे. ९ मे रोजी रात्री ११ वाजता स्पर्धेचा बक्षीस समारंभ होणार आहे. क्रिकेट प्रेमींनी या स्पर्धा पाहण्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!