आम्ही शेतकरी- कृषीमुख्य बातमी

जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यक्षेत्रात पशुंच्या खरेदी विक्रीसाठी चिखली उपबाजार स्थापन

रत्नागिरी : जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या कार्यक्षेत्रात नियमन करण्यात आलेल्या गुराची खरेदी-विक्रीसाठी बाजार क्षेत्रातील खाली निर्दिष्ट केलेली क्षेत्रे त्या त्या क्षेत्रासाठी निर्देशित केलेल्या पशुंची (पशुंपासून मिळणारे उत्पन्न-कोंबड्या, गुरेढोरे, मेंढ्या व बकरी), खरेदी–विक्रीकरिता उपबाजार गाव चिखली (ता. गुहागर) उपबाजार म्हणून स्थापन केल्याचे जाहीर करत असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे यांनी दिली. ही अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रामध्ये प्रसिध्द झाल्याच्या तारखेपासून अंमलात येईल.

रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी-विक्री (विकास व नियमन) अधिनियम, १९६३ व त्याखालील नियमांतर्गत तरतुदीनुसार सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्याकडील अधिसूचना क्रमांक ओपीएमसी/१२८५/१९८२/०७/२२३/११-सी दि. ५ नोव्हेंबर १९८५ अन्वये संपूर्ण रत्नागिरी जिल्हा महसूल क्षेत्रापुरती स्थापन करण्यात आली आहे. महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी-विक्री (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ चे कलम ३ अंतर्गत २२ ऑक्टोबर २००८ रोजीच्या अधिसूचनेद्वारे कृषी उत्पन्न- पशुपासून मिळणारे उत्पन्न (कोंबड्या, गुरेढोरे, मेंढ्या व बकरी) यांचे नियमन करण्यात आलेले आहे.

उक्त बाजार समिती यांच्याकडील पत्र जा.क्र. रजिकृउबास /गुरांचा बाजार / चिखली/मंजुरी सन २०२५ दिनांक २५ जानेवारी २०२५ अन्वये गाव चिखली (ता. गुहागर जि. रत्नागिरी) येथे गुरांचा उपबाजार सुरू करण्याविषयी उक्त बाजार समितीच्या संचालक मंडळाची मासिक सभा २१ जानेवारी २०२५ मधील ठराव क्रमांक १०(२) अन्वये सर्वानुमते निर्णय करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ चे कलम ३, ४ व ५अन्वये मसुदा अधिसुचना वर्तमानपत्रामध्ये प्रसिध्द करण्यात आलेली आहे. व महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-कोकण विभागीय पुरवणी, (गुरुवार ते बुधवार एप्रिल ३-९,२०२५) पुष्ठ क्र. २४ वर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.

जाहीर केलेल्या इह्यावर विविक्षीत मुदतीत कोणतीही सूचना व हरकत या कार्यालयाकडे व उक्त बाजार समितीकडे प्राप्त झाली नाही. म्हणून महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी-विक्री (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ चे कलम ५(२) व कृषि व सहकार विभागाकडील अधिसूचना क्रमांक एपीएम २०८२ / ३६३४०/४४०/११-सी ५ सप्टेंबर १९८१ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करत रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या कार्यक्षेत्रात नियमन केलेल्या गुराची खरेदी-विक्रीसाठी बाजार क्षेत्रातील खाली निदिष्ट केलेली क्षेत्रे त्या त्या क्षेत्रासाठी निर्देशित केलेल्या पशुंची (पशुंपासून मिळणारे उत्पन्न-कोंबड्या, गुरेढोरे, मेंढ्या व बकरी), खरेदी –विक्रीसाठी गुहागर तालुक्यातील चिखली हे गाव उपबाजार म्हणून स्थापन केल्याचे जाहीर करत आहे. ही अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रामध्ये प्रसिध्द झाल्याच्या तारखेपासून अंमलात येईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!