Uncategorized
जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांची बदली

रत्नागिरी : जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांची बृहन्मुंबई विशेष शाखेचे अपर पोलीस आयुक्त म्हणून बदली झाली आहे. राज्यातल्या अन्यही काही अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून, त्याबद्दलचा शासन आदेश आज (१६ मे) रोजी निघाला आहे. यामध्ये रत्नागिरीचे पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांचा समावेश आहे.
श्री. कुलकर्णी यांनी रत्नागिरी सोबत आपलेपणाचे नाते जोडले. त्यांच्याच नेतृत्वाखाली लोकसभा आणि विधानसभा निवडणुका शांततेत पार पडल्या. केवळ ड्युटी म्हणून नव्हे, तर रत्नागिरीतील सामान्य नागरिकांशीही त्यांचे उत्तम नाते होते. एक उत्तम अधिकारी म्हणून रत्नागिरीकर नेहमीच त्यांना लक्षात ठेवतील.



