Uncategorized
शिवसेना शहरप्रमुख प्रशांत साळुंखे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा

रत्नागिरी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रत्नागिरी शहरप्रमुख प्रशांत साळुंखे यांचा वाढदिवस शिवसेना नेते सचिव तथा माजी खासदार विनायक राऊत यांच्या रत्नागिरीतील संपर्क कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
शिवसेना उपनेते तथा माजी आमदार सुरेंद्रनाथ उर्फ बाळासाहेब माने, तालुकाप्रमुख शेखर घोसाळे, शहर संघटक प्रसाद सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. त्यावेळी तालुक्यातील व शहरातील सर्व प्रमुख पदाधिकारी, महिला संघटक, युवासेना पदाधिकारी, शिवसैनिक, मित्रपरिवार, हितचिंतक यांनी उपस्थित राहून वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.



