Uncategorized
ग्रामीण पोलीस स्थानकात उद्या होणार गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना

रत्नागिरी : ग्रामीण पोलीस ठाण्यात उद्या (३७ ऑगस्ट) सकाळी गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना होणार असून यासाठी ग्रामीण पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव आणि पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी जोरदार तयारी केलेली आहे. आज (२६ ऑगस्ट) सायंकाळी गणपती बाप्पाचे आगमन ग्रामीण पोलीस स्थानकात झाले आहे.
पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी मोठ्या उत्साहाने बाप्पाचे स्वागत केले. अकरा दिवस पोलीस स्थानकात बाप्पा विराजमान असणार आहे. सर्व नागरिकांनी बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी ग्रामीण पोलीस स्थानकात यावे, असे आवाहन ग्रामीण पोलीस दलाकडून करण्यात आले आहे.



