महाराष्ट्रमुख्य बातमी

अजितदादांच्या अंत्यविधीसाठी तयारी सुरू

मान्यवर नेत्यांची उपस्थिती; अंत्ययात्रा सुरू

पुणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बारामतीत विमान अपघातात दुर्दैवी निधन झालं. हा दिवस महाराष्ट्रासाठी अतिशय वाईट दिवस ठरला. आज त्यांच्या पार्थिवावर विद्या प्रतिष्ठान येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या या अंत्यविधीसाठी हजारो मान्यवर नेते उपस्थित राहिले आहेत.

अजितदादांची अंत्ययात्रा ग. दी. मा. सभागृह ते विद्याप्रतिष्ठान या दरम्यान काढण्यात येत आहे. फुलांनी सजवलेल्या वाहनातून ही यात्रा मार्गस्थ होत असून, रस्त्याच्या दुतर्फा हजारो नागरिक साश्रू नयनांनी दादांना निरोप देण्यासाठी उभे आहेत. अजितदादांच्या अंत्यविधीसाठी होणारी अलोट गर्दी लक्षात घेता प्रशासनाने चोख बंदोबस्त तैनात केला आहे. सर्व अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेसाठी बारामती शहरात आणि विमानतळ परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. आपल्या कामाच्या धडाक्यामुळे ओळखल्या जाणाऱ्या नेत्याला निरोप देण्यासाठी संपूर्ण बारामती शहर आज बंद ठेवण्यात आले असून सर्वत्र शांतता आणि शोककळा पसरली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!