राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत त्रिशा मयेकरला रौप्यपदक

रत्नागिरी : ३५ वी राज्यस्तरीय वरिष्ठ महिला व पुरुष अंजिक्यपद तायक्वांदो स्पर्धेचे आयोजन तायक्वांदो असोसिएशन ऑफ लातूर यांच्या वतीने लातूर जिल्हा क्रीडा संकुल औसा रोड येथे ५ ते ७ डिसेंबर दरम्यान केले होते. या स्पर्धेत गणराज क्लबच्या त्रिशा साक्षी सचिन मयेकर हिने रौप्यपदक पटकावले. १७ राज्य स्पर्धेत झालेल्या त्रिशाची ही वरिष्ठ गटाची पहिली स्पर्धा होती.
या स्पर्धेत संपूर्ण राज्यातून सुमारे ३०० खेळाडू सहभागी झाले होते. त्रिशा लोकनेते शामरावजी पेजे आर्ट कॉमर्स व सायन्स ज्युनिअर कॉलेजमध्ये बारावीत शिक्षण घेत आहे. त्रिशाला आंतरराष्ट्रीय खेळाडू, एशियन युनियन कोच, राष्ट्रीय पंच, महाराष्ट्र राज्य स्वयंसिद्धा प्रशिक्षक प्रशांत मकवाना व महिला प्रमुख प्रशिक्षक आराध्या मकवाना यांचे मार्गदर्शन लाभत आहे. त्रिशा या यशात तिच्या आई-वडिलांचा मोलाचा वाटा आहे.
रत्नागिरी जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांच्यासह तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, मुंबईचे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे, महासचिव मिलिंद पठारे, कोषाध्यक्ष व्यंकटेश कररा, उपाध्यक्ष निरज बोरसे, दुलीचंद मेश्राम, प्रवीण बोरसे, सहसचिव सुभाष पाटील, कार्यकारणी सदस्य अजित घार्गे, सतीश खेमस्कर, जिल्हा सघंटनेचे सचिव लक्ष्मण के, खजिनदार शंशाक घडशी, गणराज क्लबचे पदाधिकारी अध्यक्ष सौ. पूजा शेट्ये, उपाध्यक्ष साक्षी मयेकर, सचिव रंजना मोडूंळा, स्नेहा मोरे, परेश मोंडूला, शलाका जावकर, एसआरकेचे प्रशिक्षक शाहरुख शेख, मिलिंद भागवत आदींनी शुभेच्छा दिल्या.



