मुख्य बातमी

डॉ. संजयकुमार कलकुटगी यांची मनोविकृती चिकित्सक पदी पदोन्नती

रत्नागिरी : येथील प्रादेशिक मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजयकुमार कलकुटगी यांची पुणे येथील येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालय येथे मनोविकृती चिकित्सक पदावर पदोन्नती झाली आहे.

सार्वजनिक आरोग्य विभाग यांनी याबाबत आज शासन आदेश काढला आहे. डॉ. कलकुटगी २००२ पासून रत्नागिरीत कार्यरत आहेत. २०१७ पासून प्रादेशिक मनोरुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी पदावर काम करत आहेत. उपसचिव दीपक केंद्रे यांच्या स्वाक्षरीने विशेषज्ञ संवर्गातील मनोविकृती चिकित्सक पदावर ही पदोन्नती झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!