रत्नागिरीच्या निसर्गरम्य ठिकाणी चित्रीत ‘DN2 Films & Music’चं नवं गीत – लवकरच होणार प्रदर्शित

रत्नागिरी : कोकणाच्या निसर्गसौंदर्याने नटलेलं आणि कोकणातीलच कलाकारांनी साकारलेलं ‘DN2 Films & Music’ या युट्युब चॅनलचं नवीन गीत लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हे गीत रत्नागिरीतील निसर्गरम्य ठिकाणी चित्रित करण्यात आलं आहे.

गीताचे गायन केवल वाळज आणि सोनाली सोनावणे यांनी केलं असून, प्रमुख भूमिका विजय सोनावणे आणि रश्मी देऊलकर यांनी साकारल्या आहेत. या गाण्याला नितीन सातोपे, निलेश सातोपे आणि डी. बी. सकपाळ यांचे संगीत लाभले आहे. दिग्दर्शनाची जबाबदारी नितीन दत्ता सातोपे यांनी पार पाडली आहे. तर नृत्यदिग्दर्शन प्रमोद वासुदेव जंगम यांचं आहे.

या गीतातून प्रेक्षकांना कोकणाची सौंदर्यदृष्यं अनुभवायला मिळणार असून, सर्वच कलाकार कोकणातील असल्याने स्थानिक कलावंतांना एक उत्तम व्यासपीठ मिळाले आहे. हे गीत लवकरच ‘DN2 Films & Music’ युट्युब चॅनलवर प्रदर्शित होणार आहे.



